खान्देश

पाचोऱ्यातील गणेश विसर्जनाच्या गर्दीत हरवलेला मोबाईल पोलिसांच्या सतर्कतेने परत मिळाला.

पाचोऱ्यातील गणेश विसर्जनाच्या गर्दीत हरवलेला मोबाईल पोलिसांच्या सतर्कतेने परत मिळाला.

पाचोरा: काल (शनिवारी) पाचोऱ्यात श्री गणेश विसर्जनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. याच गर्दीत पाचोरा येथील रहिवासी राहुल अभिमन्यू सौदागर यांचा मोबाईल फोन पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पडला. मोबाईल हरवल्याची त्यांना कल्पनाही नव्हती.

सायंकाळी ६.३० च्या सुमारास, अंबा वडगाव तांडा नंबर दोन येथील दिनेश धारासिंग राठोड आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना जळगाव चौफुलीवर रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून तो मोबाईल घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता पाचोरा पोलीस स्टेशन गाठले. तेथील उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल वैशाली म्हस्के यांच्याकडे त्यांनी तो मोबाईल सुपूर्द केला.

त्याच वेळी, आपला मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच राहुल सौदागर यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून स्वतःच्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा त्यांना पोलिसांनी तुमचा मोबाईल सुरक्षित असून तो पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये येऊन घेऊन जा असे सांगितले. माहिती मिळताच राहुल यांनी पोलीस स्टेशन गाठले, आपली ओळख पटवून दिली आणि मोबाईल आपलाच असल्याचे सिद्ध केले.

पोलीस कॉन्स्टेबल वैशाली म्हस्के, प्रियांका आहेर, संदीप भोई आणि मनोहर पाटील यांच्या उपस्थितीत राहुल यांना त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याबद्दल राहुल यांनी मोबाईल शोधून पोलिसांकडे जमा करणाऱ्या दिनेश राठोड यांचे आणि पाचोरा पोलिसांचे आभार मानले. या घटनेमुळे प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या तत्परतेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button