खान्देश

पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे  नागरिकांना आवाहन !

पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे  नागरिकांना आवाहन – 

पाचोरा, (बातमीदार) – पाचोरा शहरात आता ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विशेषतः बँक व्यवहारादरम्यान अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी केले आहे. बँक भरणा किंवा पैसे काढताना होणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

घ्या ही खबरदारी:

  • लक्षपूर्वक व्यवहार करा: बँकेत पैसे भरताना किंवा काढताना आजूबाजूला लक्ष ठेवा. कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या जवळ येऊन तुमच्यावर लक्ष ठेवत नाहीये ना याची खात्री करा.
  • डिक्कीत पैसे ठेवू नका: पैशांनी भरलेली बॅग किंवा पाकीट दुचाकीच्या डिक्कीत ठेवणे टाळा. त्याऐवजी ती रक्कम स्वतःच्या खिशात किंवा एका वेगळ्या बॅगेत सुरक्षित ठेवा.
  • अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा: जर रस्त्यात कोणी ‘तुमची वस्तू पडली आहे’ किंवा ‘गाडीला काहीतरी अडकले आहे’ असे सांगून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. अशाप्रकारे ते तुमची दिशाभूल करून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात.
  • पैशांच्या बॅगची काळजी घ्या: पैशांनी भरलेली बॅग गाडीवर लावताना कोणाशीही बोलू नका. आपली बॅग सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची खात्री करा.

पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये गुन्हेगार लोकांचे लक्ष विचलित करून त्यांना फसवतात. त्यामुळे आपली आर्थिक मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button