खान्देश

भुसावळ पतपेढी गैरव्यवहार प्रकरण: १६ जणांना अटक, ९.९० कोटींचा अपहार उघड

भुसावळ पतपेढी गैरव्यवहार प्रकरण: १६ जणांना अटक, ९.९० कोटींचा अपहार उघड

जळगाव: भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीतील ९ कोटी ९० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी सोमवारी (२८ जुलै) एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात आठ संचालक आणि आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१६ ते २०२१ या कालावधीत पतपेढीत सभासदांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करून संचालक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला. हे सर्व प्रकरण लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आले. जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या ऑडिटरने या फसवणुकीबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एकूण ४५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

अटक केलेल्यांची नावे:

  • गंगाराम सीताराम हेगडे (पिंप्राळा, जळगाव)
  • हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे (सावदा, ता. रावेर)
  • राजू लालू गायकवाड (भुसावळ)
  • हितेश संजय नेहते (भुसावळ)
  • रमेश चिंधु गाजरे (फैजपूर, ता. यावल)
  • कृष्णा गजमल सटाले (रा. जामनेर)
  • मधुकर श्रीकृष्ण लहासे (पहूर, ता. जामनेर)
  • सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा, ता. रावेर)
  • कैलास पंडित तायडे (जळगाव)
  • पंकज मोतीराम ढाके (रा. भुसावळ)
  • संजय तुळशीराम चौधरी (रा. जामनेर)
  • अझरुद्दीन राजेंद्र तडवी (रा. फैजपूर)
  • राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ)
  • जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ)
  • राजेश देविदास लहासे (भुसावळ)
  • हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर)

या प्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button