खान्देश

चाळीसगाव महामार्गावर ४० ते ५० कोटींचे ‘अँफेटामाईन’ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता!

पचोरा, महाराष्ट्र: चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा येथे केलेल्या एका धडक कारवाईत जवळपास ३९ किलो अँफेटामाईन या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची अंदाजित किंमत ४० ते ५० कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईने ड्रग्जमुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला मोठे बळ मिळाले असून, यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज (२५ जुलै) चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा येथे नेहमीप्रमाणे तपासणी मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान, एका संशयित वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहनचालकासह वाहन ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, आमदार मंगेश चव्हाण यांनी  तात्काळ महामार्ग पोलीस केंद्राला भेट देऊन कारवाईबाबत अधिक माहिती जाणून घेतली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जप्त करण्यात आलेले ३९ किलो अँफेटामाईन ड्रग्ज हे दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगरमार्गे कर्नाटक राज्यातील बेंगळूरु येथे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, हे केवळ आंतरराज्य रॅकेट नसून, यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची दाट शक्यता आहे. कारण अँफेटामाईन हा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात परदेशातून तस्करी केला जातो. देशाची तरुण पिढी व्यसनाधीन करून देशाला खिळखिळा करण्याचे काम देशाचे शत्रू अंमली पदार्थांच्या पुरवठ्यातून करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.

मी या कारवाईबाबत तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना माहिती दिली असून, या प्रकरणी सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही या कारवाईची गांभीर्याने दखल घेतली आहे. पुढील तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या मोठ्या कारवाईबद्दल मी सर्व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतो. ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ या ध्येयाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button