जनतेच्या मनात घर करणारा नेता: बंडू सोनार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा!

जनतेच्या मनात घर करणारा नेता: बंडू सोनार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा!
पाचोरा, जळगाव: पाचोरा शहरात लोकसेवक म्हणून नावलौकिक असलेले जनसेवक बंडू केशव सोनार यांचा वाढदिवस, शनिवार, २० जुलै २०२५ रोजी, केवळ औपचारिकतेपुरता न थांबता, एक सामाजिक जिव्हाळ्याचा आणि जनसेवेचा उत्सव ठरला. बंडू सोनार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जनतेसाठी समर्पित आणि सेवाभावी कार्याचा आदर्श घालून दिला.
आरोग्य तपासणी शिबिर – गरजूंना दिलासा!
या दिवशी शहरातील सफाई कर्मचारी, नागरिक आणि प्रभागातील रहिवाशांसाठी ४५०० रुपये किमतीपर्यंतच्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण उपक्रमातून २०० ते ३०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या आरोग्य शिबिरातून श्रमिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जनतेत समाधानाची भावना निर्माण झाली.
वृक्षारोपण – पर्यावरणाचाही विचार!
वाढदिवसानिमित्त केवळ मानवी आरोग्याचाच नव्हे, तर पर्यावरणाचाही विचार करण्यात आला. याच दिवशी श्रीकृष्ण नगर प्रभाग क्र. ८ मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
धार्मिक सोहळा – चिंतामणी मोरयाच्या महाआरतीने समारोप
सायंकाळी साडेसात वाजता चिंतामणी कॉलनीतील जागृत देवस्थान ‘चिंतामण मोरया गणपती’ ची महाआरती बंडू सोनार व त्यांच्या पत्नी शीतल बंडू सोनार तसेच युवा नेते सुमित किशोर पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने संपन्न झाली. या सोहळ्यास ५०० ते ७०० नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावून बंडू सोनार यांच्या जनसंपर्काची प्रचिती दिली.
प्रभागात ठिकठिकाणी वाढदिवस साजरा – जनतेचा विश्वास अधिक दृढ!
संपूर्ण प्रभागातील विविध भागांमध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी ठिकठिकाणी दिवे लावले, फटाके उडवले, आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हा उत्साह बंडू सोनारांवर जनतेचा असलेला विश्वास आणि प्रेम अधोरेखित करतो.
शेवटी एवढंच म्हणावं लागेल –”वाढदिवस हा केवळ केक कापून साजरा करणं नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठी काहीतरी करून दाखवणं – हीच खरी नेतृत्त्वाची ओळख!” बंडू सोनार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसेवेचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.



