पाचोरा भडगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार प्रतापराव हरी पाटील आयोजित नगरदेवळा येथे शेतकरी कार्यकर्ता मेळाव्याला अलोट गर्दी!

- पाचोरा भडगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार प्रतापराव हरी पाटील आयोजित नगरदेवळा येथे शेतकरी कार्यकर्ता मेळाव्याला अलोट गर्दी
*(मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)*
- नगरदेवळा (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाच्या शेतकरी व गोरगरीब व सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी नगरदेवळा येथे भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शिक्षण महर्षी तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ पूनम ताई प्रशांतराव पाटील यांनी केले होते
या वेळी नगरदेवळा गटातील शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर कृष्णराव पाटील नगरदेवळा हे होते
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पूजन केल्यानंतर सुरुवात करण्यात आली. शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवाजी आत्माराम पाटील यांनी उपस्थित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की नानासाहेब म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नसलेली व्यक्ती असून त्यांच्या पाठीशी सर्व शेतकरी बांधवांनी खंबीरपणे उभे राहावे व त्यांना आमदार करावे असे आवाहन केले. यानंतर राजू पाटील यांनी आपले मनोगतातून त्यांनी इंन्द्रजीत भालेराव यांच्या कवितेचा उल्लेख करून शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा मांडली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा केलेला आहे. आणि तो लढा लढवणारे नानासाहेब हे शेतकरी पुत्र आहेत. त्यांना सर्वांनी खंबीरपणे साथ द्यावी. शेतकरी पुत्र म्हणून ती निवडणूक लढवत आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन याप्रसंगी केले. त्यानंतर
सचिन भैय्यासाहेब पाटील बाळद ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की नानासाहेब हे चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्व आहेत व शेतकरी पुत्र आहेत गोरगरिबांचे कैवारी आहेत. ते खऱ्या अर्थाने शेतीची जाण असणारे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे आहेत म्हणून त्यांना विधानसभेमध्ये निवडून द्यावे असे त्यांनी सांगितले या प्रसंगी जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पुनमताई प्रशांत पाटील यांनी आपले मनोगतातून कै. तात्यासाहेब कै. अण्णासाहेब व नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या कार्याची ओळख करून दिली. त्यानंतर मतदारसंघांमध्ये रखडलेले प्रश्न बलून बंधारे, सिंचनाचा प्रश्न एमआयडीसीचा विकास शेतकऱ्यांच्या व्यथा महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.तसेच तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नानासाहेबांच्या मार्फत त्यांनी दिले. त्याचप्रमाणे महिलांचा विकास वृद्ध लोकांसाठी विविध योजना नानासाहेबांच्या माध्यमातून राबवू आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवू असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी एकदा संधी नाना साहेबांना देऊन निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले त्यानंतर पाटील यांनी उपस्थित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना म्हटले की मतदारसंघांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी त्या संधीचे मी सोने करून दाखवेल व मला मताचे भरभरून दान द्या असे त्यांनी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतातून नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे आणि निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विश्वास पुंडलिक पाटील, देविदास संतोष पाटील, नगरदेवळा येथील शेतकरी व कार्यकर्त्या मेळाव्यासाठी या गटातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक दुध डेअरीचे चेअरमन व्हाईट चेअरमन व संचालक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. व्यासपीठावर बाळदचे अंबादास पाटील, वामन पाटील संगमेश्वर मेघनाथ पाटील बदरखे माजी सभापती मनीषा पाटील वडजी गणेश कोळी, संग्राम पाटील पिंपरी, बाळू पैलवान, रामराव पाटील माजी सरपंच गाळण सुनील कदम माजी सरपंच चुंचाळे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील शिवाजी पाटील, बी . वाय. पाटील हे उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले.



