राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी परमेश्वर पाटील यांची नियुक्ती !

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी परमेश्वर पाटील यांची नियुक्ती
पाचोरा (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी अखेर खेडगाव नंदी येथील निष्ठावंत कार्यकर्ते परमेश्वर सुभाष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे पद अनेक दिवसांपासून रिक्त होते.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पांडुरंग पाटील यांनी परमेश्वर पाटील यांची पाचोरा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी परमेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीपत्र प्रदान करताना प्रमोद पाटील यांच्यासह प्रशांत पाटील, बंडू ढमाले, अमोल धनगर, प्रेमराज पाटील, अनिल कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
फोटो कॅप्शन:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर परमेश्वर पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व उपस्थित पदाधिकारी.



