खान्देश

आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्रीनिवास हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्रीनिवास हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!
शिबिरात एकूण ११५ लोकांनी घेतला लाभ तर ५० लोकांनी केले रक्तदान
पाचोरा, १३ जुलै २०२५: आज, रविवार , दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पाचोरा येथे आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव आणि श्रीनिवास हॉस्पिटल, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराचा लाभ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, वकील बार असोसिएशनचे सदस्य, होमगार्ड संघटना, पत्रकार संघटना तसेच सर्व पाचोरावासीयांनी मोठ्या संख्येने घेतला.

या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले. जळगाव येथील आयकॉन हॉस्पिटलचे डॉ. पाराजी वाचेवार यांनी बीपी, शुगर आणि दम्यासारख्या विकारांवर तपासणी केली, तर डॉ. वैभव फारके यांनी मूळव्याध, फिशर आणि भगंदर यांवर सल्ला दिला. हाडांच्या विकारांसाठी डॉ. अमोल पाटील (आयकॉन हॉस्पिटल, जळगाव) उपस्थित होते.

पाचोरा येथील श्रीनिवास हॉस्पिटलचे डॉ. नरेश गवंदे यांनी जनरल फिजिशियन म्हणून सेवा दिली, तर आशिर्वाद डेन्टल क्लिनिकचे डॉ. हर्षल देव यांनी दातांच्या आरोग्याची तपासणी केली. कॅन्सरसाठी मानवता हॉस्पिटल, जळगाव येथून डेपोटी डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तन्बीर पटेल (पाचोरा) आणि श्रीकृष्ण होमिओपॅथिक क्लिनिकचे डॉ. अतुल पाटील यांनी होमिओपॅथिक फिजिशियन म्हणून रुग्णांची तपासणी केली.

या भव्य शिबिराचे आयोजन पाचोरा पोलीस बॉईज असोसिएशन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने करण्यात आले होते.यात रक्तदात्यांना हेल्मेट व सर्टिफिकेट देवून सन्मानित देखील करण्यात आले.  हे शिबिर श्रीनिवास हॉस्पिटल, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न झाले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button