खान्देश

पाचोरा तालुका पुन्हा हादरला; चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवीले पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी पतीला घेतले ताब्यात !

पाचोरा तालुका पुन्हा हादरला; चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवीले
पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी पतीला घेतले ताब्यात !
पाचोरा निभोरा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर येथे खुशाल भवाणे हे वास्तव्यास होते. खुशाल भदाणे याचे २०१६ मध्ये पिंप्राळा येथील प्रियंका हिच्याशी लग्न झाले होते. खुशाल हा कुशल सेंट्रीग कारागिर असून सेंट्रीग काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता, दरम्यान खुशाल भदाणे याची पत्नी प्रियंका हिने पाचोरा येथे वास्तव्यास जाण्याचा आग्रह पती कडे धरला, चारित्र्याच्या संशयावरून खुशाल भदाणे व प्रियंका यांच्या कौटुंबिक वाद सुरु होते. कारणावरून जळगाव येथील महिला आयोग येथे प्रकरण प्रलंबित असून महिला आयोगाने दोधांमध्ये समेट घडवून आणला होता. मात्र पत्नी हिच्या आग्रहास्तव खुशाल भदाणे हे पत्नी व आपल्या दोन मुलांसह पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी येथे गेल्या दिड महिन्यांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्यास होते. खुशाल भदाणे हे सेंट्रींग काम करीत होत्ते. दरम्यान, प्रियंका हिच्या चारित्र्यावर खुशाल पाटील संशय घेत होते. अखेर दि. २० जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रियंका व खुशाल भदाणे यांच्यात टोकाचे भांडण झाले. यात खुशाल भदाणे यांनी रागाच्या भरात घरातील चाकुने प्रियंकाच्या गळ्यावर व पोटात वार केले, क्षणार्धात प्रियंका ही रक्ताच्या थारोळ्यात पडली व तिचा जागीच मृत्यू झाला, या घटनेच्या वेळी शेजाऱ्यांनी भांडणाचा आवाज ऐकल्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तर, खुशाल भदाणे हा पत्नी प्रियंका हिच्या मृतदेहासमौर गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयन करत असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता जारगाव चौफुलीवर गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश गणने,पो. कॉ. शरद पाटील, पो. कॉ, संदिप पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठत खुशाल भदाणे यास ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिची मावशी सुनवा प्रकाश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून खुशाल भदाणे यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ऊ. नि. संजय निकुंभ है करीत आहेत. मयत प्रियंका हिच्या पश्चात एक ८ वर्षांचा व एक ५ वर्षांचा मुलगा आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button