मणिपुर घटनेचा तिव्र निषेध दोषींना फाशी द्या.पोलीस निरीक्षकांना निवेदन !

मणिपुर घटनेचा तिव्र निषेध दोषींना फाशी द्या.पोलीस निरीक्षकांना निवेदन !
भडगांव (प्रतिनिधी) : मणिपुरमध्ये महिलांची विवस्रावस्थेत धिंड काढण्यात आली. सामूहिक अत्याचार करण्यात आले. सदर घटना भारतीय संस्कृती सभ्य समाजाला काळीमा फासणारी तसेच अत्यंत निंदनीय घृणास्पद आहे. बेटी बचाव बेटी पढाव संदेश असलेल्या शासन प्रशासन व भारतीय आदर्श समाजाने वेळीच या घटनेची तात्काळ दख़ल घ्यावी. या घटनांची पुनरावृती होऊ नये म्हणून घटनेतील दोषींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्या व पिडीतांना त्वरित न्याय मिळावा यासाठी कायम स्वरूपी कायदा व जलद न्यायाची व्यवस्था करा. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना पाटील, सदस्या रेखा पाटील, सुषमा भावसार, अभिनव संस्था अध्यक्षा डॉ.सुवर्णा पाटील, सदस्या चंदा पाटील, प्रेरणा पाटील, रिना पाटील आदि महिला प्रतिनिधींनी दिले.



