प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त अभिवादन!

प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त अभिवादन!
पाचोरा (प्रतिनिधी)- जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थी जिनिषा संघवी , अक्षरा बाफना कनिष्कां जैन, लिशा जैन, मुदित धाडीवाल या विद्यार्थ्यांनी महाराज साहब यांच्या कार्याबदद्ल माहीती सांगुन नवकार मंत्राचे उच्चारण केले.तसेच वैशाली, रीतेश ललवाणी यांनी किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी , सचिव जीवनजी जैन ,खजिनदार जगदीशजी खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक प्रभुलालजी शर्मा आणि सौ .वैशालीजी रितेशजी ललवाणी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील मॅडम सी. ई.ओ. अतुल चित्ते पर्यवेक्षिका विद्या थेपडे मॅडम हे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन पिंकी जैन यांनी केले. कार्यकमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते



