राजकीय

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न* *बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार*

*भडगाव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे)-पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न* *बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार*
*भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार*
पाचोरा-
दि.२८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होणाऱ्या पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवली जाणार असुन भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत काही समविचारी उमेदवार निवडणूक लढणार आहे.ही निवडणूक भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सतीषबापु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी आपला स्वतंत्र संपर्क सुरू केलेला आहे.

आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी आमदारांनी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अफवांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी बळी पडु नये. तसेच भाजपा पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ असुन या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागले आहे.असे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे व आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार दुसऱ्या पक्षांचे प्रवक्तेपद बळजबरीने उसने भाड्याने घेतल्यासारखे पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत.त्यांची स्वबळावर निवडणुका लढवण्याची ताकत पूर्णपणे खचली असल्याणे आमदारांना व त्याच्या उर्वरित उमेदवारांना कुठलाही आत्मविश्वास उरलेला दिसत नाही.
ज्या आमदारांना पूर्वी भाजपा नकोशी होती. भाजपाच्या नावाने आतापर्यंत ते आकांड तांडव करत होते.भाजपा कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देत होते.त्यांना आज अचानक भाजपाची गरज का पडतेय ? त्यांना भाजपाची आठवण येण्याची उपरती का झाली ? असे प्रश्न यावेळी भाजपाचे भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात उपस्थित केले आहे.
तसेच 20 तारखेला माघारी नंतर भाजपा व समविचारी उमेदवारांच्या प्रचारांत भारतीय जनता पार्टीचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करतील असे शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. तसेच आमदारांनी मेळाव्यात व पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना योग्यत्या ठिकाणी पुराव्या निशी उत्तर देऊन त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा करू.असे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सदर पत्रकात म्हटले आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button