माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष महाजन सह प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश: एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास !

माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष महाजन सह प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश: एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास !- आमदार किशोर पाटील
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत, माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ महाजन, चिंधु भाऊ मोकळ, संजूभाऊ महाले, तसेच समता परिषदेचे शहराध्यक्ष कन्हैया देवरे आणि विजय महाजन यांनी आज मुंबई येथे अधिकृतपणे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून, माळी समाज आणि समता परिषदेतील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
या प्रसंगी पाचोरा – भडगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचाही या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशात महत्त्वपूर्ण वाटा होता. किशोर पाटील यांनी या सर्वांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील , चंद्रकांत धनवडे , किशोर बारावकर इत्यादी उपस्थित होते
या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना, खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे. आज प्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांमुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल आणि माळी समाज तसेच समता परिषदेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.”
यावेळी संतोष भाऊ महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वावर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. समाजाच्या विकासासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही शिवसेनेसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
कन्हैया देवरे यांनीही यावेळी बोलताना, समता परिषदेच्या माध्यमातून समाजातील समानता आणि न्यायासाठी शिवसेना पक्ष नेहमीच पाठिंबा देईल अशी आशा व्यक्त केली.
या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात माळी समाजामुळे शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशाचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.



