लोहारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर !

लोहारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
लोहारा, दि. ५ डिसेंबर २०२३: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामराज्य फाऊंडेशन लोहारा तथा माणुसकी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मराठी मुलांची शाळा, बस स्टॅण्ड, लोहारा येथे होणार आहे.
या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रक्तदान हे एक महान सामाजिक कार्य आहे. रक्तदानाने आपण आजुबाजूच्या गरजू लोकांना मदत करू शकतो.
या शिबिरासाठी प्रमुख मान्यवर म्हणून लोहारा शहर पत्रकार मंच उपस्थित राहतील. तर प्रमुख सहकार्य बजरंग गृप लोहारा, विर भगतसिंग गृप, सर्व गणपती व दुर्गा उत्सव मंडळ, लोहारा यांच्याकडून मिळणार आहे.
या शिबिरासाठी संपर्क :- संतोष कोळी Mo. 9689679343



