खान्देश

प्रांताधिकारी कार्यालयात “गुड गव्हर्नन्स विक” अंतर्गत लोकशाही दिन साजरा-लाभार्थांना प्रमाणपत्र वाटप

प्रांताधिकारी कार्यालयात “गुड गव्हर्नन्स विक” अंतर्गत लोकशाही दिन साजरा-लाभार्थांना प्रमाणपत्र वाटप

पाचोरा- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे “गुड गव्हर्नन्स विक” या प्रशासनिक सुधार व लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत गुड गव्हर्नन्स विक अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” ही मोहीम १९ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान राबविण्यात आली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तहसिलदार विजय बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, युवानेते सुमित किशोर पाटील, आमदारांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार सुभाष कुंभार, गट विकास अधिकारी गोकुळ बोरसे, संजय गांधी विभागाच्या नायब तहसिलदार प्रतिभा राजपुत, सहाय्यक निबंधक सह. संस्था आर. आर. पाटील, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंता प्रियंका घोरपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलानी उपस्थित होते.सदर मोहिमेदरम्यान पाचोरा तालुक्यातील मंडळ स्तरावर लोकांचे प्रलंबित अर्ज, प्रशासना विषयी अभिप्राय, शासकीय योजनाची माहिती, इतर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने २३ डिसेंबर रोजी तालुक्यातील मंडळ मुख्यालय पाचोरा, कुऱ्हाड खु, गाळण बु, नगरदेवळा बु, नांद्रा, पिंपळगांव, लोहटार, वरखेडी बु, शिंदाड येथे सकाळी १० वाजता सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका व बचत गटातील सदस्य यांचे उपस्थितीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. तसेच पाचोरा तालुका स्तरावर लोकांचे प्रलंबित अर्ज, प्रशासना विषयी अभिप्राय, शासकीय योजनाची माहिती, इतर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तहसिलदार विजय बनसोडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गाव की और या संकल्पनेतुन प्रशासकीय कामे गतिमान होण्यासाठी ई – ऑफिस योजने अंतर्गत कागद, वेळ यांची बचत होवुन ई – फायलिंगच्या माध्यमातून रेकाॅर्ड सुरक्षित रित्या हाताळणे सोपे होते. ही योजना कार्यान्वित झाल्यापासुन ६५० फाईल ह्या ई आॅफिस मार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या ५ लाभार्थी यांच्या बॅंक खात्यात लाभाची रक्कम वर्ग करण्यात आल्याचे प्रमाणपत्र, २६ लाभार्थ्यांना ई – रेशन कार्ड, संजय गांधी योजने अंतर्गत मंजुरी मिळालेल्या १४ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थितांकडुन १० तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले असुन तक्रारदारांचे अर्ज स्विकारुन त्यांना टोकन देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा तालुक्यातील लोकप्रतिनीधी, सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन व पदाधिकारी, प्रगतीशील शेतकरी तसेच पत्रकार बांधव, लाभार्थी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button