खान्देश
काकन बर्डी येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे यात्रेनिमित्त मोफत शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप !

काकन बर्डी येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे यात्रेनिमित्त मोफत शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप !

पाचोरा (प्रतिनिधी) काकन बर्डी येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे यात्रेनिमित्त मोफत शुद्ध पिण्याचे पाण्याचे
वाटप चंपाषष्ठी यात्रेनिमित्त करण्यात आले होते. या पाणपोळीचे उद्घाटन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी पीएसआय प्रकाश संतोष पाटील, पीएसआय सुनील पाटील, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक हरी पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, रवींद्र पाटील, किरण पाटील, समर्थ पाटील, गजमल पाटील, शिवदास पाटील, रोहिदास पाटील, मच्छिंद्र पाटील, श्री ऑफसेटचे संचालक प्रवीण पाटील, देवस्थानचे ट्रस्टी भूषण देशमुख, रवींद्र देशमुख यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



