खान्देश

पाचोरा येथे मतदान यंत्रे सिलींग सेंटींगचे कामकाज पुर्ण-निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे

पाचोरा (प्रतिनिधी):-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 18- पाचोरा
विधानसभा मतदार संघासाठी 355 मतदान केंद्रासाठी दिनांक – 11/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथे 18- पाचोरा विधानसभा मतदार संघातील 354+1 मतदान केंद्राकरीता SYMBOL UPLOADING व BU, CU PAIRING ‘चेक कामकाज करण्यात आले.  निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बनसोडे, श्रीमती शितल सोलाट, रणजित पाटील, नायब तहसिलदार (निवडणूक) व उमेदवार प्रतिनिधी यांचे समक्ष दिनांक-11/11/2024 रोजी सकाळी 9.50 वाजता महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथील स्ट्रॉंग रुम व्हिडीओ चित्रीकरण करुन उघडण्यात आला. SYMBOL UPLOADING व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कार्यान्वित करणे (उमेदवार
निश्चिती) (EVM COMMISSIONING) साठी स्ट्रांग रूम उघडण्यासाठी सदर दिवशी सकाळी 8.00 वाजता उपस्थित राहणेबाबत उमेदवार यांना दिनांक-07/11/2024 रोजी, मेल, व्हॉटसअॅप व्दारे व प्रत्यक्ष पत्राव्दारे कळविण्यात आले होते. सदर दिवशी  अमोल ठाकुर, श्रीकांत अशोक गरुड, ज्ञानेश्वर पंडीत पाटील,  जितेंद्र विठठलराव पेंढारकर,  किशोर बाबुराव शिणकर, सुनिल तुळशीराम पाटील व  रुपेश शिंदे हे उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ करीता एकुण CU 426, BU-426 व VVPAT-461 प्राप्त झालेले होते.
          तरी दिनांक-11/11/2024 रोजी VVPAT मशीन व BU, CU, PAIRING करण्यात आली व 461 VVPAT  SYMBOL UPLOADING चे कामकाज पुर्ण करण्यात आले.
              त्यांनतर EVM COMMISSIONING चे 1 ते 20 टेबल निहाय BUCU, VVPAT प्रत्येकी मतदान केंद्राचे मशिन EVM COMMISSIONING कामी देण्यात आले. त्यांनतर त्यांचे COMMISSIONING पूर्ण झाल्यानंतर BU, CU, VVPAT स्ट्रॉंग रुमला मतदान केंद्रनिहाय ठेवण्यात आले. त्यांनतर 5% मतदान केंद्राच्या EVM वर 1000 वोटींग कामी 22 मतदान केंद्राचे मॉक पोल घेणेकामी सर्व मतदान केंद्राच्या (राखीव सह) करून पांढन्या रंगाच्या डब्यात टाकण्यात आल्या. सदर चिठ्ठया लकी ड्रॉ पध्दतीने श्री.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे  यांच्या समक्ष उमेदवार प्रतिनिधी यांच्या हस्ते 22 मतदान केंद्राच्या सोडचिठ्ठया काढण्यात येवुन मतदान यंत्र निवडण्यात आले. त्यानंतर सदरील 22 मशिन क्रमनिहाय मांकपोल च्या टेबल क्र.01 ते 22 वर मॉकपोल घेणेकामी देण्यात आले.
सदरचा संपुर्ण प्रक्रीयेत   निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय
अधिकारी भूषण अहिरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भडगाव तहसिलदार श्रीमती शीतल सोलाट, निवडणूक नायब तहसिलदार, रणजित पाटील, निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत, सेक्टर ऑफीसर व त्यांच्या पथकातील नियुक्त कर्मचारी यांनी कामकाज केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button