खान्देश

दिलीपभाऊ वाघ यांना ग्रामीण भागात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*दिलीपभाऊ वाघ यांना ग्रामीण भागात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

*पिंपळगावसह सातगाव,वाडी शेवाळे आणि शिंदाड मधून महिलांनी दिला अभुतपूर्व प्रतिसाद*

 

पाचोरा- माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या समर्थनार्थ महिलांनी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्ष महिलांशी संपर्क साधून प्रगतीच्या आणि विकासाच्या राजकारणासाठी महिलांनी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे असे आवाहन केले.

सौ.ज्योती वाघ यांच्या नेतृत्वात पिंपळगाव, डोंगरी सातगाव,वाडी-शेवाळे,शिंदाड येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या समर्थनार्थ या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गावातील महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून दिलीपभाऊ वाघ यांनी मतदार संघाच्या विकासासाठी जाहीर केलेला जाहीरनामा समजावून सांगत गाव आणि शहराच्या विकासासाठी दिलीपभाऊ वाघ यांना खंबीर पाठिंबा देऊन विजयी करण्याचे आवाहन देखील केले. महिलांनी देखील आपापल्या गावात या प्रचार रॅलीचे औक्षण करून स्वागत केले.आपल्या कुटुंबासह इतरांना देखील दिलीपभाऊ वाघ यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मांडलेला दृष्टिकोन समजावून सांगण्यात आलं तर या गावातील महिलांनी दिलीपभाऊ वाघ यांना प्रचंड विजयाची हमी देखील दिली. दिलीपभाऊ वाघ यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले उचलून महिलांसाठी देखील रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अपेक्षा देखील यावेळी महिलांनी बोलून दाखवल्या. दिलीपभाऊ वाघ यांच्या शिट्टी चिन्हावर विश्वास दर्शवत निश्चित यशाची ग्वाही देखील महिलांनी दिली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button