खान्देश

माजी आमदार दिलीप‎ वाघ‎ यांना‎ व्यापाऱ्यांचा‎ उदंड‎ प्रतिसाद प्रचंड‎ विजयाचा दिला‎ विश्वास!

माजी आमदार दिलीप‎ वाघ‎ यांना‎ व्यापाऱ्यांचा‎ उदंड‎ प्रतिसाद
प्रचंड‎ विजयाचा दिला‎ विश्वास!
पाचोरा-‎ माजी आमदार‎ दिलीप‎ वाघ‎ यांनी‎ विधानसभेसाठी अपक्ष‎ उमेदवारी जाहीर‎ केली‎ असून त्यांनी‎ प्रचाराचा‎ गतिमान‎ वेग घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिलीपभाऊ वाघ यांनी पाचोरा‎ शहरामधील महाराणा प्रताप चौक,‎ भडगाव रोड, विविध‎ शॉपिंग‎ कॉम्प्लेक्स,मार्केट‎ कमिटी,स्टेशन‎ रोड,‎ जामनेर रोड, छत्रपती‎ शिवाजी महाराज‎ चौकातील मुख्य‎ बाजारपेठ,‎ भाजी‎ मार्केट तसेच पाचोरा शहरातील‎ सुवर्णपेठ म्हणून‎ ओळख असलेल्या गांधी‎ चौक इत्यादी‎ महत्वपूर्ण भागात‎ आपल्या‎ प्रचार‎ दौऱ्याचे नियोजन केले होते.


यावेळी त्यांनी‎ शहरातील सोन्याचे‎ व्यापारी आणि‎ सुवर्णपेढी यांना प्रत्यक्ष‎ भेट‎ देऊन‎ त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.‎ शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व बाजारपेठातून दिलीपभाऊ‎ वाघ यांनी‎ भेटी‎ दिल्या. यावेळी‎ कापड,किराणा,इलेक्ट्रॉनिक्स,भांडी,हॉटेल, सुपर मार्केट, दुग्धजन्य‎ पदार्थ‎ व्यावसायिक, पुस्तक‎ व‎ जनरल स्टोअर्स‎ अशा विविध व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष‎ संवाद‎ साधत दिलीपभाऊ‎ वाघ‎ यांनी‎ प्रचाराची सूत्र‎ वेगवान केले.
व्यापारी वर्गांनी‎ देखील‎ जल्लोषात त्यांचे‎ स्वागत‎ करत‎ ठिकठिकाणी‎ आनंदोत्सव साजरा‎ केला.यावेळी दिलीप वाघ यांच्या‎ झालेल्या छोट्याशा‎ भेटीत‎ देखील सदिच्छा देताना‎ व्यापारी‎ बांधवांनी‎ भविष्यातील‎ आमदार‎ म्हणून दिलीप वाघ यांनी‎ पाचोरा शहरातील व्यापार‎ व‎ उद्योग व्यवसायांना गतिमान‎ बनवून चालना‎ द्यावी अशा शुभेच्छा‎ देखील दिल्या.यावेळी‎ त्यांचे‎ बंधू‎ संजयनाना वाघ‎ यांचे समवेत‎ सर्व‎ पदाधिकारी‎ व‎ कार्यकर्ते‎ मोठ्या उत्साहाने‎ प्रचार कार्यात सहभागी झाल्याचे दिसून आले.‎ व्यापारी बांधवांनी‎ देखील लक्ष्मीपूजनाचा प्रसाद‎ देत‎ दिलीप वाघ यांना‎ विजयाच्या‎ शुभेच्छा‎ दिल्या आणि‎ पाचोरा शहरातील व्यापारी‎ बांधव‎ त्यांच्या‎ पाठीशी‎ सक्षमपणे‎ उभा‎ असल्याचे‎ देखील बोलून दाखवले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button