राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या १४, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल महाजन यांची नियुक्ती !

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या १४, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल महाजन यांची नियुक्ती.
१४, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार . गुलाबराव देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव अनिल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ दैनंदिन सर्व कामकाजामध्ये लक्ष घालणे व त्याचप्रमाणे प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून दैनंदिन घडामोडीचा अहवाल द्यावा. असे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहेत. तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी सहीनशी नियुक्तीपत्र दिनांक ०५/११/२०२४ रोजी मीडियाला प्रसिद्ध केले आहे.



