जनतेच्या प्रेमामुळेच मला उर्जा मिळते-आ.कुणाल पाटील शिंदखेडा तालुक्यातर्फे आ.पाटील यांचा नागरी सत्कार.

जनतेच्या प्रेमामुळेच मला उर्जा मिळते-आ.कुणाल पाटील शिंदखेडा तालुक्यातर्फे आ.पाटील यांचा नागरी सत्कार.
प्रतिनिधी: सतिष पवार (९५२७७९९३०४)
दिनांक: २०/०९/२०२४ धुळे- धुळे तालुक्यासह जिल्हयातील मातीशी आणि इथल्या प्रत्येक माणसाशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. जनता आमच्यावर मनापासून करीत असलेल्या प्रेमामुळेच मला उर्जा मिळत असते. त्यामुळे जनतेची सुख-दु:खे वाटून घेत त्यात सामील होणे मी माझे कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आ.कुणाल पाटील यांनी केले. दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडी परिवर्तनासाठी एकवटली असून महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे खंबीरपणे उभे राहून संधीचे सोने करावे असे आवाहन आ.पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्यावतीने आ.पाटील यांचा जाहिर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. धुळ्यातील सौभाग्य लॉन येथे बुधवार दि.१८ सप्टेंबर रोजी दु.१ वा. शिंदखेडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा यांनी सांगितले कि, खान्देशातून सर्वाधिक महाविकास आघाडीचे आमदार निवडून येथील आणि आ.कुणाल पाटील हे राज्यात निश्चितच कॅबिनेट मंत्री होतील. सत्काराला उत्तर देतांना आ.कुणाल पाटील म्हणाले कि, जिल्हयातील आणि राज्यातील वातावरण बदलले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या डॉ.शोभाताई बच्छाव निवडणूक आल्या.आता यापुढे आमदार,जि.प.,पं.स. आणि नगरपालिका,महानगरपालिकेवरही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल असा विश्वास आ.कुणाल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.हीच माझ्या वाढदिवसाची भेट- माझ्या वाढदिवसानिमित्ताने शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले हीच खरी माझी वाढदिवसाची भेट आहे. त्यामुळे आता सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमदेवारामागे खंबीरपणे उभे रहा आणि संधीचे सोने करुन घ्या, असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.सत्कार समारंभाप्रसंगी शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे,माजी खा.बापू चौरे, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई.नगराळे, काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम, ज्ञानेश्वर भामरे, माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ, आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, भटक्या विमुक्त सेलचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे,जि.प.सदस्य पोपटराव सोनवणे,जि.प.सदस्य शाहनाभाऊ सोनवणे,जि.प.सदस्य ललित वारुडे, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, युवा नेते रायबा कुणाल पाटील, ज्येष्ठ नेते रामभाऊ माणिक, संचालक पंढरीनाथ पाटील, ज्येष्ठ नेते बापू महाजन,सचिन सोनवणे, सेवा दल अध्यक्ष अलोक रघुवंशी,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे,रविराज भामरे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दिपक साळुके, डॉ.एस.टी.पाटील, जि.प.सदस्य अरुण पाटील, प्रविण चौरे, कैलास ठाकरे, राजीव पाटील, बापु खैरनार,रतिलाल पाटील, कमलाकर बागले, महेंद्र निकम,कुलदिप निकम,राजेंद्र पाटील,अशोक सोनवणे,सर्जेराव जाधव, बापू ठाकरे, महेंद्र पाटील, शामकांत पाटील, हुसेन बोहरी, दिलीप पाटील, प्रकाश धनगर, केतन भदाणे, सुरेश देसले, शहानाभाऊ कोळी, भाईदास निळे,डॉ.प्रशांत बागुल, उमेश वाडीले, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नरेंद्र पाटील, प्रविण पवार, तनु देसले, माधव पाटील, कैलास आखाडे, भोजुसिंग गिरासे, सतिष पाटील, बापू काळु पाटील, भुषण पाटील, अशोक सोनवणे, कल्याण बागल, चंद्रकांत शिरसाठ, पंजाबराव पवार,नेवबा पठाण, लिलाधर मासुळे, हर्षवर्धन खैरनार, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.



