मैत्रेय भव्य एल्गार मेळावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न …..

मैत्रेय भव्य एल्गार मेळावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न …..
भडगाव- प्रतिनिधी -(संजय शेवाळे) -मैत्रेय भव्य एल्गार मेळावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न …..
दि.15/9/2024 रोजी मैत्रेय एल्गार मेळाव्याचे भव्य आयोजन मैत्रेय पिडीत ठेवीदारांच्या माध्यमातून करण्यात आले. गेल्या 8 वर्षापासून मैत्रेय पीडित ठेवीदार आपला हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करीत आहेत . महाराष्ट्रात बहुसंख्य आमदार ,खासदार ,मंत्री यांना निवेदन देऊन व समक्ष भेटून ठेवीदारांनी आपली व्यथा मांडल्या पण ,कुठल्याच प्रकारे पीडित ठेवीदारांना न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रात 100 ते 125 आमदारांना अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्यासाठी मैत्रेय ठेवीदारांनी निवेदन दिले. त्यात आमदार कुणाल बाबा पाटील यांनाही तारांकित प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देण्यात आले .2023 च्या हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे एकमेव आमदार कुणाल बाबा पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उत्कृष्ट पद्धतीने मांडून मैत्रेय पिडीत ठेवीदारांची व्यथा मांडली. मैत्रेय च्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांना पैसा दिला जाऊ शकतो . इतक्या प्रॉपर्टी महाराष्ट्र सह भारतात आहेत. हे त्यांनी विधानसभेत मांडले . आमदार कुणाल बाबा पाटील यांनी मैत्रेय पीडित ठेवीदारांना मार्गदर्शन केले. की ठेवीदारांचा एक एक रुपया शेवटच्या ठेवीदारापर्यंत मिळत नाही .तोपर्यंत मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करीन .न्यायालयीन प्रकरणात जीही काही मदत लागेल ती मी करीन व येता विधानसभा निवडणुकीनंतर जर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आले .तर 6 महिन्यातच मैत्रेय ठेवीदारांचा पैसा मी मिळवून देईल असे आश्वासन आमदार कुणाल बाबा पाटील यांनी केले. आमदार कुणाल बाबा पाटील यांना भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्म यांच्या हातून उत्कृष्ट आमदार भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मैत्रेय ठेवीदारांकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .मैत्रेय एल्गार मेळाव्यात मैत्रेयपीडित महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मेळाव्यात आमदार कुणाला बाबा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई पाटील यांनी मैत्रेय पीडित महिलांच्या संपूर्ण व्यथा जाणून घेतल्या. मैत्रेय एल्गार मेळाव्यात मैत्रेय प्रकरणावर दिवस रात्र काम करणारे पदाधिकारी नानासाहेब पाटील महेन्द्र (पिंटू )दर्डा , राजेंद्र देवरे ,भैय्यासाहेब माळी पुष्पाबाई पाटील ,सुरेखा वानखेडे, मनीषा पाटील ,साधना चौधरी ,यांनी मैत्रेय प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मांडली. मैत्रेय एल्गार मेळावा यशस्वी होण्यासाठी किरण बापू नगराळे यांनी अनमोल सहकार्य केले. एल्गार मेळाव्यात प्रदीप शिसोदे,सुरेश खैरनार, गणेश देशमुख ,राजेश पाटील ,राजेंद्र दर्डा ,अमृत पाटील, दिलीप माळी, पंकज खैरनार, दिलीप शिंदे ,सुभाष पाटील, लतिष पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. मैत्रेय प्रकरणासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी , व मंत्रालयात, पाठपुरावासाठी उदय संखे, डॉ. हरपनहळ्ळी , यासिन सय्यद यांचेही अनमोल सहकार्य लाभले



