निर्मल सिडसच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी यांचेकडून नाभिक समाजबांधवांना उपयुक्त किटचे वाटप.

निर्मल सिडसच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी यांचेकडून नाभिक समाजबांधवांना उपयुक्त किटचे वाटप..
*भडगांव (प्रतिनिधी)* : नाभिक समाजबांधवांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात. त्याचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्यास कटिबध्द आहोत असे प्रतिपादन निर्मल सिडसच्या संचालिका वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले आहे. त्यांच्या वतीने भडगांव शहरात व तालुक्यात नाभिक बांधवांना सलून व्यवसाय संबधित उपयुक्त किटचे वाटप शहर अध्यक्ष शंकर मारवाडी, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पवार, माजी नगरसेवक शरीफ शेख, युवक तालुकाध्यक्ष चेतन पाटील, नाभिक संघाचे अध्यक्ष संजय पवार, ऍड. मोहसिन शेख, नितीन बाविस्कर, सोमनाथ पाटील, मनीष सोनवणे, माजी प्राचार्य डी. डी. पाटील सर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी समाजबांधव तसेच शिवसेना, युवासेना, युवती व महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



