विजांच्या कडकडात व मुसळधार पावसामुळे लोहारी-आर्वे येथील पिकांचे व सौर पंप प्लेटांचे नुकसान !

विजांच्या कडकडात व मुसळधार पावसामुळे लोहारी आर्वे येथील पिकांचे व सौर पंप प्लेटांचे नुकसान !
लोहारी (प्रतिनिधी) :-
विजांच्या कडकडात व मुसळधार पावसामुळे लोहारी आर्वे येथील पिकांचे व सौर पंप प्लेटांचे नुकसान !
पाचोरा तालुक्यातील लोहारी आर्वे परिसरात मुसळधार मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान तर लोहारी येथे एकाचा वीज पडून मृत्य तर लोहारी व आर्वे शिवारातील दिव्यराज विजय पाटील , साहेबराव शिवराम पाटील , सोनाबाई भारत बागुल , रविंद्र माणिक पाटील यांच्या सौर प्लेटा निकामी झाल्याने नुकसान तर कंपनीने प्लेटा बदल करून देण्याची शेतकर्यांची मागणी तसेच ऐन दिवाळी समोर असताना पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतात असणारं कपाशी , मका , सोयाबीन पीक इ. काही जणांनी घरी आणली असली तरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व मका , शेतातच पडून आहे. या मुसळधार पावसामुळे शेतात पडून असणारं कापूस , सोयाबीन खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. अनेकांच्या शेतात तुरीला फुलोरा आला असून दिवाळीनंतर येणाऱ्या तुरीवर देखील या पावसामुळे संकट कोसळलं आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुरीला फटका ,ज्वारी , मका , सोयाबीन , कपाशी . ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने शेतक-यांच्या तोंडी आलेला घास गेला असल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे . तर अनेक शेतक-यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून शासनाने दिलेले सौर पंप व सौर प्लेटा कंपनीने बदल करून द्याव्या अशी मागणी नुकसान झालेले शेतकरी करीत आहे.



