खान्देश

लोहारा विद्यालयात कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन !

लोहारा विद्यालयात कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन

भारत पाटील (म्हसास प्रतिनिधी) शेंदुर्णी येथील द. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 3 जुलै 2024 रोजी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर येथील पीएसआय अमोल पवार  तसेच क्राइम ब्रांच प्रमुख अरुण राजपूत लोहारा येथील कॉन्स्टेबल शैलेशजी चव्हाण लोहारा येथील पोलीस पाटील सुरेंद्र शेळके तसेच पत्रकार कृष्णा आप्पा शेळके, दिलीप राजपूत, चंदू खरे उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचा मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके यांनी विद्यालयात उपस्थित पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उपस्थित पोलीस बांधवांचा पत्रकार बंधूंचा सुद्धा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएम सुर्वे सर यांनी केले कायद्यात झालेले बदल याविषयी माहिती दिली तसेच उपस्थित पीएस आय अमोल पवार साहेबांनी विद्यार्थ्यांना 1 जुलै 2024 पासुन भारतीय संविधान रचनेनुसार कायद्यामध्ये झालेले बदल नियमात झालेले बदल ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गुन्हा नोंदवल्या जाऊ शकतो याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली विद्यालयाचे उपमुख्यध्यापक एस व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पीएम सुर्वे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील  यांनी केले व आभार पी. यु.खरे यांनी मानले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button