शिक्षकांदिनी सैनिकाकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना योगा ड्रेसचे वाटप

शिक्षकांदिनी सैनिकाकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना योगा ड्रेसचे वाटप
पाचोरा, ०५ सप्टेंबर: येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक कौतुकास्पद कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सुपुत्र अमोल गोविंदा बनकर यांच्या वतीने शाळेतील सर्व मुला-मुलींना योगा ड्रेसचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत वाघ (गुरुजी) होते. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि गावातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय सैन्य दलातील जवान अमोल बनकर यांनी विद्यार्थ्यांना योगा ड्रेसचे वाटप केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बडगुजर सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, श्री. अमोल बनकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेबांचा सत्कार करण्यात आला. तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वाघ गुरुजी आणि सेवानिवृत्त सैनिक श्री. विठ्ठल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी माजी सरपंच अरुण पाटील, आर.आर. पाटील, रविंद्र चव्हाण, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, धनराज पाटील, इंद्रचंद्र पाटील, शांताराम पाटील, अशोक पाटील, बापू पाटील, रवि कोळी, जगदीश पाटील, देवचंद कोळी, शरद पाटील, गणेश पाटील, बापू पहिलवान, समाधान बनकर, भोला बनकर, आबा बनकर, सतीश पाटील आणि विजय मराठे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एका सैनिकाने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि शिक्षणप्रेमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



