जामनेर न्यू ज़िकरा उर्दू प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

जामनेर न्यू ज़िकरा उर्दू प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.
जामनेर प्रतिनिधी: इमरान खान
जामनेर प्रतिनिधी:, दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी शहरातील ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा जामनेर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी कमी खर्चात विविध प्रकारचे प्रकल्प तयार करून आणले होते. विद्यार्थ्यांची विज्ञाना विषयीची आवड पाहून शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारता मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे,शैक्षणिक संस्था,शास्त्रज्ञ,संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नव विश्व विक्रम केला आहे. २१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे,कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चालल्याचे आपणाला दिसते आहे.नवनवीन यंत्रे,तंत्रज्ञान हे सर्व बदल विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजा मध्ये खूप अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत.आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण परिणामाचा शोध लावला.यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो, तसेच या कार्यक्रमात, मुख्याध्यापक समीउर रेहमान, आसिफ हसन, आसिफ अजिज,व सर्व, शिक्षकगण, उपस्थित होते सूत्रसंचालन वसीम एज़ाज़,यांनी केला



