विज्ञान दिनानिमित्त सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न !

विज्ञान दिनानिमित्त सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न !
पाचोरा – आज सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान दिनानिमित्त एका भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध वैज्ञानिक कल्पना आणि संकल्पना सादर केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुजा अमोल शिंदे, श्री पंडीतराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव शिंदे, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, सौ. सा. प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक सु. ना. पाटील, पर्यवेक्षक महेश देशमुख , मुख्याध्यापक समाधान महाजन , शिक्षक वृंद आणि पालक बंधुभगिनी उपस्थित होते.
सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे अवलोकन केले आणि त्यांचे कौतुक केले. या प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा, रोबोटिक्स, हवामान बदल, जलसंधारण, आणि इतर अनेक विषयांचा समावेश होता.
शाळेचे मुख्याध्यापक समाधान माधवराव महाजन यांनी विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांचे टिपलेले क्षण :-



- विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सर्जनशीलता विकसित करण्याचे एक उत्तम साधन आहे. सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेने आयोजित केलेले हे विज्ञान प्रदर्शन निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.



