खान्देश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर राकेश रंजन, सहाय्यक खर्च निवडणूक निरीक्षक यांची पाचोरा येथे भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर राकेश रंजन, सहाय्यक खर्च निवडणूक निरीक्षक यांची पाचोरा येथे भेट !

पाचोरा (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर राकेश रंजन, सहाय्यक खर्च निवडणूक निरीक्षक यांनी आज दिनांक-19/10/2024 रोजी पाचोरा येथे भेट दिली.
सदर भेटी मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता स्थापन करण्यात आलेला आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष व मतदार सुविधा कक्षाची पाहणी करुन निवडणूक संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.
तदनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात VVT Team, FST Team, SST Team, VST Team, तसेच Control Room, निवडणूक खर्चाबाबत नियुक्ती अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवुन निवडणूकीचे काम जबाबदारीने व चांगल्या पध्दतीने कामकाज करणे बाबत सुचना देवुन सदर कामकाज बाबत अहवाल / रिपोर्ट अचुकपणे सादर करणेबाबत सुचना देण्यात आले.
तसेच निवडणुकी संदर्भात समस्या अथवा आचारसंहिते बाबत तक्रार असल्यास निवडणूकामी नियुक्त असलेले निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या 9405026850 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी  उपविभागीय अधिकारी व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button