खान्देश

जिल्हा उपाध्यक्ष पदी विठ्ठल महाजन माऊली तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष पदी प्रदीप माळी यांची नियुक्ती .

जिल्हा उपाध्यक्ष पदी विठ्ठल महाजन माऊली तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष पदी प्रदीप माळी यांची नियुक्ती .

पाचोराः महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष पदी प्रदीप आसाराम माळी यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  स्वप्नील चंद्रशेखर बोबडे प्रदेश अध्यक्ष आबासाहेब भास्करराव महाजन पारोळा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश महाजन जळगाव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
पुढे शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली म्हणाले समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक व राजकीय घडामोडी प्राप्त होण्यासाठी समाजाचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सतत कामातून समाजाला न्याय हक्कासाठी व पाठबळ देण्यासाठी काम करत राहु तसेच संत महापुरुषांच्या विचारांची धुरा घेऊन व जयंती पुण्यतिथी तसेच सामाजिक उपक्रम राष्ट्रीय देशभक्ती पर उपक्रम साजरा करत राहणार संघटनेच्या माध्यमातून समाजाचे अनेक विषय मार्गी लावण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार ही संघटना पुढे घेऊन जाण्यासाठी व समाजाला नविन चैतन्य निर्माण होण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना समाज हीताचेच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी स्थापन झालेली आहे या निवडीचे सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव सर्वत्र कौतुक होत आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button