पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ३१ वर्षीय व्यक्तीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ३१ वर्षीय व्यक्तीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा ३१ वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी अमोल – संसारे (वय ३१) याने अल्पवयीन मुलीस आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. तर अल्पवयीन मुलीने विरोध करत जोराने ओरडली असता अमोलने पीडितेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १५ डिसेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित अमोल संसारे याच्याविरुध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. अमोल पवार करत आहे. अमोल संसारे यास जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



