क्राईमदेश विदेश

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष !

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष !

पाचोरा,(प्रतिनिधी):- ‘नापाक’ इरादाI(ntention), ठेवत आपल्या वैरी देशाला भारताची गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला दिल्याच्या आरोपवरून ATS च्या अटकेत असलेला गौरव पाटील (Gaurav patil) हा २३ वर्षाचा तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याने खळबळ उडाली असतांना गौरव वडील मात्र माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या त्याचे आयटी चे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील याचे वडील म्हणाले की, माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला देशाची सेवा करायची

असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही. माझा मुलगा हा पेट्रोल पंपाच्या वर काम करायचा आणि एक दिवस फोन करून त्याला मुंबईला बोलावले आणि अटक केली त्यावेळी मला खूप धक्का बसला अशी माहिती गौरवच्या वडिलांनी दिली आहे. माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केली आहे.तर, गौरव अर्जुन पाटील याच्या अटकेची माहिती आज मिळताच परिसरात एकच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button