खान्देश

भडगाव येथे व्हॉईस ऑफ मीडियातर्फे खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; कारवाईची मागणी!

भडगाव येथे व्हॉईस ऑफ मीडियातर्फे खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; कारवाईची मागणी

भडगाव (प्रतिनिधी) : शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेतर्फे भडगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

आज भडगाव स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांना व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी पत्रकारांचा सन्मान राखला जावा तसेच पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल मराठे, तालुका अध्यक्ष विलास पाटील, शहर अध्यक्ष संजय शेवाळे, तालुका उपाध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, ज्येष्ठ सल्लागार अशोक परदेशी तसेच शहर संघटक गणेश अहिरे उपस्थित होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांविषयी अवमानास्पद भाषा वापरणे योग्य नसल्याचे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध असून भविष्यातही अशा घटनांविरोधात तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button