खान्देश

महिला दक्षता अध्यक्षा मा. नगरसेविका योजनाताई पाटील छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण सन्मान पुरस्काराने सन्मानित

महिला दक्षता अध्यक्षा मा. नगरसेविका योजनाताई पाटील छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण सन्मान पुरस्काराने सन्मानित
भडगांव (प्रतिनिधी) महिला दक्षता अध्यक्षा मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्काराने मा. प्रा. शरद पाटील, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे सह मान्यवर पदाधिकारी यांचे हस्ते राजश्री सभागृह धुळे येथे आज दुपारी 1 वाजता समानपत्र, ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. योजना पाटील यांच्या सामाजिक, राजकीय, क्षैक्षणिक, शेती सहकार, धार्मिक, क्रिडा, महिला सबलीकरण, यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान बचतगट मार्गदर्शन, कोरोना काळातील कार्य, प्रशासन सहकार्य, स्वच्छ्ता पर्यावरण संतुलन वृक्षारोपण, निस्वार्थ जनसेवाकार्य, अंधश्रद्धा निर्मुलन, नगरपरिषद माध्यमातून विविध विकासात्मक कामे, संजय गांधी निराधार योजना सेवाकार्य, शासन प्रशासनकडून विविध समस्या निवारण, सरकारी रुग्णालय योजना, मोफत धान्य योजनाद्वारे निराधारांसाठी सतत प्रयत्नशील, पो. स्टे. महिला दक्षता समितीद्वारे अनेकांचे संसार समाज प्रबोधन परिवार समन्वयातून उभे केले. अशा विविध क्षेत्रात योगदानाची दख़ल घेत निराधारांचे निःश्वार्थ सेवाप्रती गौरव केला. सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, नियोजन समिती अध्यक्ष आर. डी. पाटील, संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, राज्याध्यक्ष संतोषराव पाटील, कार्याध्यक्ष गोपीचंद पाटील, उपाध्यक्ष विलासराव देसले सह समिती पदाधिकरी उपस्थितीत होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button