खान्देश

स्वर्गीय मा.आमदार आर ओ पाटील जयंती महोत्सव संपन्न !

स्वर्गीय मा.आमदार आर ओ पाटील जयंती महोत्सव संपन्न


पाचोरा: साडेतीन मुहूर्ता पैकी दसरा सण एक मुहूर्त या पवित्र तिथीला स्वर्गीय मा.आमदार आर ओ पाटील यांचा जन्मकाळ सोहळा दि. 24/10/2023 मंगळवार रोजी सकाळी 11:00 वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात स्वर्गीय मा.आमदार आर ओ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यापण पुष्पचक्र तथा फुलांच्या वर्षाव करून यथाविधी पूजन  ग. भा. कमलताई पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, डॉ. सुरेश पाटील, डॉ जे.सी राजपूत, डॉ.डी. आर. देशमुख, सुरेश पाटील , मेहताब सिंग नाईक, दिलीप भांडारकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर सुरेश पाटील  निर्मल सीद्द्स  संचालक म्हणाले की आर ओ तात्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य कर्तत्वाचा सामाजिक बांधिलकीच्या तसेच हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्दता, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसायिक पंढरीची वारीचा वसा पूर्णपार उच्च संस्कार आदी सर्वांचा माननीय तात्या साहेबांच्या व्यक्तीत्वावर झालेला होता. म्हणून अत्यंत वैभवशाली, देदीप्यमान, नेतृत्व, पितृत्व, पालकत्व जन्माला आले. त्यांच्या प्रेरणेतून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, निर्मल इंटरनॅशनल स्कूल व आदर्श कृषी सेवा केंद्र आधी यशस्वीपणे गरुड भरारी घेत आहे. त्यांच्या आठवणी म्हणजे प्रेमाचा त्यागाचा अभिमानाचा आपलेपणाचा झरा आहे.अशा भावपूर्ण शब्दात आदरांजली देण्यात आली यावेळी  मेहताप सिंग नाईक, शांताराम चौधरी पत्रकार यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सामाजिक बांधिलकेतून अपंग बांधवांना सायकल वाटप त्याचा होतकर गरजू विद्यार्थ्या बांधवांना स्पर्धा परीक्षा पुस्तक संच उमेश पाटील यांचे सहकारी मित्र यांना देण्यात आला. सायकल मिळालेली अपंग बांधवांमध्ये रवींद्र बळीराम माळी, योगेश लक्ष्मण पाटील, भगवान बाबुलाल पाटील, मनीषा राजेंद्र कोळी, मंदाबाई शंकर ठाकरे, महानंदा सुरेश वाणी, प्रदीप रमेश पाटील, लक्ष्मण गोविंद माळी, संजय भिकन पाटील, ज्ञानेश्वर नारायण पवार, पुष्पाबाई राजेंद्र चव्हाण, निखिल साहेबराव माळी, दिनकर वसंत मोरे, वाल्मीक शिवाजी पाटील, सुनील रामचंद्र मोरे, सुनील नागरे, संजय ओंकार सोनवणे, शंकर भराडी, ज्ञानेश्वर बापू पाटील, विजय हिलाल जाधव, लक्ष्मण भाऊलाल पाटील, ईश्वर सयाजी पाटील, ज्ञानेश्वर सांडू लोहार, कमलाबाई दारसिंग चव्हाण, विनोद बारकू पाटील, सुरेश दगा महाजन, होते. यावेळी दसरा यावेळी दसरा शुभ मुहूर्तावर सौ. रीना गणपत पाटील भडगाव, सोनाली रघुनाथ पाटील, कंचन मिलिंद मोरे आदी नारीशक्तींनी भगवा रुमाल घालून  वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून घेतला. याप्रसंगी तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी जि.प सदस्य राजेंद्र पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, तालुका युवा अधिकारी शशी पाटील, भाऊसाहेब पाटील, अभिषेक खंडेलवाल, गोपाल परदेशी, तीलोत्तमा मौर्य, महानंदाताई पाटील, मंदाकिनी पारोचे, कुंदन पांड्या, भडगाव परिसरातून श्री गणेश परदेशी, मच्छिंद्र आबा, राजू मोरे, फकीरा पाटील, अनिल महाजन, प्रकाश महाजन, संजय महाजन, शंभू तात्या समाधान पाटील, भैय्या पाटील रतन परदेशी जेके पाटील, तुकाराम महाजन आणि माधव जगताप, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, कॉ-आर्डिनेटर स्नेहल पाटील सह पक्षाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडोच्या  संख्येने  तालुक्यातून नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रस्ताविक आणि आभार नाना वाघ यांनी केले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button