शीतल एकेडमीचा नवरात्रात “जागर इंग्रची भाषेचा” !

शीतल एकेडमीचा नवरात्रात “जागर इंग्रची भाषेचा”
पारोळा (प्रतिनिधी) – “कोण बनेगा इंग्लिश का चॅम्पियन” या अनोख्या उपक्रम खान्देशात ठरतोय होतोय विशेष आकर्षण !
“नमस्कार देवियो और सज्जनो, मे अमिताभ बच्चन स्वागत करता हु , कोन बनेगा करोडपती मे” हे वाक्य भारतातील तमाम 130 कोटी जनतेच्या समोर एक दृश्य उभं करत ते समोर असणारे दोन हॉट सिट आणि दोखांमध्ये संवाद घडवून आणणारे कम्प्युटरजी…..
त्याचबरोबर अमिताभ जी यांच्या प्रश्नला स्पर्धकाचे काय उत्तर असेल आणि त्या उत्तराची वाट बघणारे प्रेक्षक यांच्या हृद्ययाचे चुकलेले ठोके. हे सर्व आपण अनुभवलं आहे ते आपल्या टीव्हीसमोर.
पण काय होईल हा प्रत्यक्ष सेट तुमच्या समोर तर, तीच हॉट सीट, तेच कम्प्युटरजी, आणि तेच प्रश्न उत्तरांचा सस्पेन्स। आणि या हॉट सीट वर स्पर्धक म्हणून बसण्याची संधी ती सुद्धा गावात.
होय, सध्या खान्देशात याच अश्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा आहे. शीतल एकेडमी, पारोळा यांनी राबविलेल्या “कोण बनेगा इंग्लिश का चॅम्पियन” या उपक्रमा मार्फत ही संधी आपणास उपलब्ध करून दिली आहे. शीतल अकेडमी चे संचालक श्री रवींद्र पाटील सर यांच्या संकल्पनेतुन प्रत्यक्ष चालता फिरता सेट त्यांनी “कोण बनेगा इंग्लिश का चॅम्पियन” साठी तयार करून घेतला आहे. हा सेट प्रत्यक्ष कार्यक्रम ठिकाणी जाऊन इंग्रजी ग्रामर, पजल, भाषा, स्पेलिंग अश्या आशयवर आधारित प्रश्न विचारून त्याची अचूक उत्तरे देण्याच्या स्पर्धकाला आकर्षक बक्षीस सुद्धा दिले जाते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालक आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतील श्री जीवन मोरे सर म्हणजे अफलातून व्यक्तिमत्त्व.
अगदी दूरचित्रवाणी वर जशी उत्सुकता प्रश्न आणि उत्तर देताना कार्यक्रमात जाणवते अगदी त्याच प्रमाणे हा अनुभव प्रत्यक्ष येताना नागरिक सांगताय. या कार्यक्रमात स्पर्धकांना बक्षीसच नव्हे इतर प्रेक्षकांच्या ज्ञानात देखील भर पडत आहे। विशेष म्हणजे यात कोणत्याही वयोगटातील व्यक्ती याना प्रवेश असल्याने सर्व स्पर्धकांना या विशेष संधी बद्दल अत्यानंद झाल्याचे दिसून आले
शहरात या चालत्या बोलत्या इंग्रजी शिक्षणाचा उपक्रम म्हणजे नवरात्रीच्या काळात दुर्गा मंडळाना पर्वणीच. उत्सव आणि शिक्षण या दोघांची उत्तम सांगड शीतल एकेडमी पारोळा यांनी उपलब्ध करून दिली आहे.
इंग्रजी भाषेचे आजच्या युगातील महत्व लक्षात घेता, इंग्रजी भाषा शिक्षण देणारी देशात नामांकित ब्रँड अशी शीतल एकेडमी आहे. यातील पारोळा शाखा ही नेहमी विविध उपक्रमात अग्रगण्य आहे. कोण बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमावर आधारित चालता बोलत प्रत्यक्ष नेपथ्य असणारा “कोण बनेगा इंग्लिश का चॅम्पियन” हा उपक्रम देशात प्रथम असावा. शीतल एकेडमी पारोळा या माध्यमातून आतापर्यंत हजारो विध्यार्थी इंग्रजी भाषेचे शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत. अनेकानी आपल्या पदात पदोन्नती केली आहे. हसत खेळत आणि सोप्या भाषेत इंग्रजी शिकविण्याचा हातखंडा असलेली या ऍकॅडमीत अनेक व्यावसायिक तथा गृहिणीनी देखील इंग्रजी भाषा अवगत केली आहे त्याचा त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात उपयोग होऊन व्यापार तथा मुलांच्या शिक्षणासाठी देखील फायदेशीर ठरला आहे.
त्याच अनुषंगाने “मिशन इंग्लिश” हे सर्वांपर्यंत पोहोचावे, प्रत्येक स्तरातील लोकांना याचा लाभ मिळवून द्यावा याची एकप्रकारे चळवळच शीतल एकेडमी पारोळा यांनी सुरू केलेली दिसतेय याला नागरिक , विध्यार्थी, गृहिणी, उद्योजक, तरुण तरुणींचा मिळणार प्रतिसाद बघता ही चळवळ व्यापक रूप धारण करेल अस दिसतय.
“कोण बनेगा इंग्लिश का चॅम्पियन” साठी अनेक सामाजिक, तथा शैक्षणिक संस्था या आमंत्रित करीत आहेत. निश्चितच सर्व इच्छुकापर्यंत पोहोचण्याचा आणि या उपक्रमात सामील करून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास संचालक श्री रवींद्र पाटील सर यांनी व्यक्त केलाय.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीची प्रिन्सिपल विशाल पाटील, मिरसिंग सर, मंगेश पवार हेमंत सर यांचे सहकार्य लाभले



