पांचाळेश्वर नगर (कोंडवाडा गल्ली ) येथे बळीराजा उत्सव समितीच्यावतीने बळीराजा गौरव दिन साजरा!

पांचाळेश्वर नगर (कोंडवाडा गल्ली ) येथे बळीराजा उत्सव समितीच्यावतीने बळीराजा गौरव दिन साजरा !
पाचोरा (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पांचाळेश्वर नगर येथे बळीराजा उत्सव समितीच्यावतीने बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नरेश गवांदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्वप्नील पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे सर, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ शिंदे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ऐ से पाटील सर, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, यूवानेतै संदीप राजे, शिवश्री रविंद्र भाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष S.k. पाटील, नगरसेवक विकास पाटील, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष लीलाधर पाटील, महावीर व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष गजानन महाराज जोशी, डॉक्टर शेखर पाटील, पोलीस अमोल पाटील आणि राहुल बोरसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मासाहेब जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी बळीराजा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, बळीराजा हे एक महान राजा होते. त्यांचे राज्य अत्यंत सुखी होते. प्रजा सुखी होती. बळीराजा हे एक पराक्रमी राजे होते. त्यांनी अनेक शत्रूंना पराभूत केले. त्यांनी अनेक धर्मांबद्दल आदरभाव ठेवला.
या कार्यक्रमात अनेक विचारवंतांनी बळीराजा यांच्याबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, बळीराजा हे एक आदर्श राजे होते. त्यांच्या विचारांचा आजही आपल्याला आदर्श ठेवावा लागेल. यात कार्यक्रमाचे प्रस्तावना विकास पाटील सर व गुणवंत साळुंखे यांनी बळीराजा जीवन चरित्रावर त्यांचे विचार मांडले व सुनील पाटील सुनील शिंदे यांनी सम्राट बळीराजा यांना 5000 वर्षे झाले तरी मी आज माझी आई माऊली बहीण भावाला ओवाळिताना ईडा पिडा जाऊ दे बळी राज्य येऊ दे व माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे व बळीराजांचे विचार घराघरात पोहोचू दे बळीराजा हा कोण होता कोणाचा वंशज होता याच्या राज्यात प्रजा किती सुखी होती दुःख काय होतं ते माहित नव्हतं असा राजा पुन्हा होणे नाही असे विचारवंतांनी आपले विचार मांडताना म्हटले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे आभार राजेंद्र सुखदेव पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमात बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, बळीराजा यांच्यावरील कविता, गीत आणि नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.



