खान्देश

श्री. पंडीतराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा !

श्री. पंडीतराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा !

पाचोरा (प्रतिनिधी)आज दिनांक 31-1-2025 रोजी श्री .पंडीतराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय तात्यासो. पंडी तराव शिंदे हे होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माननीय दादासो नीरज जी मुनोत संस्थेचे सचिव दादासो. एड्व्होकेट.जे . डी.काटकर, शाळेची माजी विद्यार्थिनी. एड्व्होकेट चंचल पाटील. सौ पूजा ताई शिंदे व श्री महेश देशमुख सर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच प्रास्ताविक श्री. महेश देशमुख सर यांनी केले . यामध्ये शाळेला मिळालेल्या इयत्ता दहावीच्या मागील वर्षाच्या निकाला विषयी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धांमधील यशाविषयी प्रमुख पाहुण्यांना माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. यामध्ये आकांक्षा अमृतकर, दिशा दिनेश पाटील, आदित्य बडगे, प्रज्वल महालपुरे, दिशा संजय पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादासो नीरज मुनोत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनाविषयी व परीक्षेला सामोरे जाणे विषयी मार्गदर्शन केले. तसेच शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी चंचल पाटील हिनेदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्व्होकेट. जे.डी.काटकर यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका के. डी. पाटील  व दिशा पाटील यांनी केले आभार प्रदर्शन शाळेची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सुदिक्षा पाटील हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस पी पाटील . ए. एम. सायानी , सह शिक्षक सोनजे ,गव्हाणे , सतीष ब्राह्मणे , नबाब तडवी व संजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button