खान्देश

पाचोर्यात कॉग्रेस च्या हातावर उबाठाची सेनेची राखी

पाचोर्यात कॉग्रेस च्या हातावर उबाठाची सेनेची राखी .

पाचोरा (प्रतिनिधी) –  महाविकास आघाडीच्या घटक पक्षात कॉग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहाने केला यावेळी कॉग्रेस च्या हातावर उबाठा सेनेची राखी बांधण्याचा योग आल्याने एकच चर्चा होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्षाबंधन निमित्ताने महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले यावेळी शिवसेनेच्या उबाठा नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रताप पाटील, इरफान मनियार, राहुल शिंदे, कल्पेश येवले, जिभाउ पाटील आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा चे अरुण पाटील, पप्पू राजपुत, अनिल सांवत, भरत खंडेलवाल, तिलोत्तमा मौर्य, आदि उपस्थितीत होते. यावेळी कॉग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना प्रामाणिक सहकार्य करण्याचे बंधन करण्यात आले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button