खान्देश

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना, कारण अस्पष्ट !

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना, कारण अस्पष्ट !

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास
लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. ९ ऑक्टोंबर रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. घटना घडली तेव्हा, विवाहितेचे सासू-सासरे हे पुढील खोलीत असल्याची माहिती मिळाली. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
प्रियंका श्रीकांत बारी (वय २६, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, पती, दोन मुले, सासू-सासरे असा परिवार आहे. (केसीएन) प्रियंकाचे पती श्रीकांत हे हॉटेल चालक असून ग्रामपंचायतमध्ये कॅम्पुटर ऑपरेटर म्हणून जॉब करीत परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री प्रियंकाचे सासू-सासरे हे पुढील खोलीत हॉलमध्ये बसलेले होते तर प्रियंका ही आतल्या खोलीत होती. काही वेळाने कुटुंबीय प्रियंकाच्या खोलीत गेले असता तिने पंख्याला ओढणीने गळफास लावलेला दिसून आला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button