पाचोरा आणि भडगावमध्ये डेंग्यूचा धोका, शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा !

पाचोरा आणि भडगावमध्ये डेंग्यूचा धोका, शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा !
पाचोरा, 23 ऑक्टोबर 2023: पाचोरा आणि भडगाव शहर आणि तालुक्यातील डेंग्यूची साथ वाढण्याची शक्यता लक्षात घेता, शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा करण्यात आला.
यावेळी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, “पाचोरा आणि भडगावमध्ये सध्या डेंग्यू, ताप, मलेरिया, सर्दी आणि खोकला अशा विविध आजारांच्या साथीने थैमान घातले आहे. ही साथी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
या साथीने अनेक कुटुंब आणि लोक त्रस्त आहेत. याची दखल घेऊन आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात आणि ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीतून जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचे नियोजन केले आहे. हा उपक्रम शहरात आणि ग्रामीण भागात 23 ऑक्टोबर 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.”
वैशालीताई सुर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपण सर्वांनी आपल्या भागात, कॉलनीमध्ये परिणामकारक फवारणीसाठी सहकार्य करावे. त्याचबरोबर दसरा आणि दिवाळी या शाळा सुटीच्या काळात आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.”
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश जी बाफना, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, गौरव पाटील, संदीप जैन, खंडू सोनवणे, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, गफार भाई, अजय पाटील, जीवन चौधरी, कैलास मिस्त्री, नामदेव चौधरी, मंगेश सोमवंशी एम के ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे संचालक सह समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



