खान्देशदेश विदेश

बोरकुंड येथे इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन.

बोरकुंड येथे इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन.

मॅरेथाॅन स्पर्धा व रक्तदान शिबिराने होणार नववर्षाचे स्वागत, नोंदणीचे आवाहन, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान, इंदुरीकरांसह तीन किर्तनकार करतील किर्तनाचा गजर, तयारीस वेग.

प्रतिनिधी: सतिष पवार

संपर्क.९५२७७९९३०४

०६ धुळे ग्रामीण- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड तर्फे, सालाबादप्रमाणे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दि.१ जानेवारी ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या तयारीस वेग आला आहे. बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणार्‍या या जिल्हा मॅरेथाॅन स्पर्धेसाठी व रक्तदान शिबिरासाठी युवक-युवतींनी नावे नोंदवावीत असे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि.प.सदस्या शालिनीताई भदाणे यांनी केले आहे या महोत्सवात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यासह तीन किर्तनकारांचा, तीन दिवस कीर्तनाचा गजर असणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव क्रीडा, धार्मिक, आरोंग्य, युवक, प्रबोधन, सामाजिक, सांस्कृतीक आदी क्षेत्रात रस असणार्‍यांसाठी एक पर्वणीच ठरते.

वाटचाल शाश्वत विकासाकडे हा मुलमंत्र अंगिकारत इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानची विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रतिष्ठानने आरोंग्य, क्रीडा, शिक्षण, युवक कल्याण, महिला सक्षमीकरण, सामाजिक, सांस्कृतीक, पर्यावरण, ग्रामविकास, कृषी, आदी क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. निष्काम जन सेवायं समर्पिता या ब्रीदवाक्याने प्रेरीत होऊन प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. यातच दरवर्षी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाने नववर्षाचे स्वागत केले जाते. यात नागरीकांमध्ये- विशेषत: आरोग्यसंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने भव्य मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दि.१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता होणार्‍या या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कबड्डीपटू व प्रो कबड्डी स्पर्धा खेळाडू महिंद्र राजपूत उपस्थित राहणार आहेत. ही मॅरेथाॅन स्पर्धा १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी खुली आहे. एक धाव सुदृढ आरोग्यासाठी या मंत्रानुसार होणार्‍या या स्पर्धेत अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार अशी प्रत्येक दोन व १ हजार रुपयाची चार विशेष उत्तेजनार्थ पारितोषीक देण्यात येतील. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. यात युवक व युवती या दोन्ही गटासाठी स्वतंत्ररित्या पारितोषीक मिळणार आहेत. सालाबादाप्रमाणे यावर्षीही नववर्षाचे स्वागत रक्तदान शिबीराने होणार आहे. यात दि. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलात हे रक्तदान शिबिर होईल. या शिबिराचा शुभारंभ श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे यांच्या हस्ते होईल. दि.१ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान, तीन दिवस किर्तनाचा गजर असणार आहे. यात निवृत्ती महाराज इंदुरीकर, सोपान शास्त्री सानप हिंगोलीकर व किशोर महाराज दिवटे जालना यांचे कीर्तन होतील. दि.३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, शिक्षणप्रेरिका सावित्रीबाई फुले या विषयावर व्याख्यान होईल. पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातील कवी कथा प्रसिद्ध लेखक प्रेमचंद अहिरराव हे यावेळी व्याख्याते म्हणून राहतील. बोरकुंड मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणाच्या होणाऱ्या या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास उपस्थितीचे तसेच नाव नोंदणीचे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे व प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि.प.सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button