खान्देशरिपोर्टर

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत  सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम व जनजागृती अभियान सुरू !

प्रतिनिधी (पाचोरा) – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत तालुक्यात सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम व जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान 33 हजार नागरिकांपर्यंत पोहोचून 87 पथकांच्या मदतीने मोहीम राबविली जात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली. भारत सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दहा दिवसांच्या सर्व्हेक्षणात ग्रामीण भागातील दहा टक्के लोकसंख्येमध्ये सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. या मोहिमेद्वारे रुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढविणे, नागरिकांमध्ये आजाराविषयी जनजागृती करणे, लवकरच निदान करून उपचार देणे हा मोहिमेमागील हेतू आहे. तालुक्यांतर्गत 33 हजार लोकसंख्या व 6 हजार 952 घरांची निवड करण्यात आली आहे. एकूण 87 पथकांमधील 174 कर्मचारी या लोकांपर्यंत पोहोचून क्षयरुग्णांचा शोध घेऊन जनजागृतीचे काम प्रभावीपणे करणार आहेत. महिलांच्या तपासणीसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पातील महिला सेविका तर पुरुषांच्या तपासणीसाठी पुरुष स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. तपासणीकामी घरोघरी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती. जगताप यांनी केले आहे. तालुक्यात एकूण 11 थुंकी तपासणी केंद्र आहेत. तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांकडे संशयित क्षयरोग तपासणीसाठी येत असतील तर त्यांनी शासनाला माहिती कळवावी असे आवाहन पंचायत समितीचे वरिष्ठ क्षयरोग उपचार प्रयवेक्षक श्री. नितीन रक्ताते यांनी केले आहे.
➖ मोफत उपचार सुविधा
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ ही लक्षरोगाची लक्षणे आहेत. प्राथमिक टप्प्यात औषधे न घेतल्यास एमडीआरटीबी रोग होऊ शकतो. या रोगाच्या निदानासाठी नाशिक सामान्य रुग्णालयात सीबी नेट मशीन उपलब्ध आहेत. तपासणीसह मोफत उपचार व औषधांची सुविधा रुग्णांना दिली जाते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button