क्राईम

पाचोर्यात बनावट पोलिसांकडून लूट, सावधानता बाळगा !

पाचोर्यात बनावट पोलिसांकडून लूट, सावधानता बाळगा

पाचोरा शहरात बनावट पोलिसांकडून लूट करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू आहे. काल दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या मुख्य भास्कर नगर व गाडगेबाबा नगर प्रवेशद्वारा जवळील महादेव मंदिराजवळ बसलेल्या 70 वर्षीय वयोवृद्धास अज्ञात दोन इसमानी गंडवले.

घटना:

भास्कर नगर मधील सेवानिवृत्त रहिवासी सिताराम बाबा हे नेहमीप्रमाणे हायवे जवळील प्रवेशद्वाराजवळील बाजूला असलेल्या प्रसिद्ध महादेव मंदिरात येऊन पूजा अर्चना करून दर्शन घेऊन तेथीलच बाकावर बसले असता येथे दोन इसम आले. त्यातील एकाने मराठा टपरी मागील बाजूस उभे राहत आवाज दिला असता बाबा त्यांच्याजवळ गेले असता आम्ही पोलीस असून या ठिकाणी एका गुन्हेगाराचा शोध घेत आहोत आपले ओळखपत्र दाखवा, असे सांगितले. त्याचवेळी त्यांच्यात सहभागी इसम तेथून जाण्याचे नाटक करू लागला. त्याचवेळेस त्या भुरट्या पोलिसाने त्यास आवाज देत ऐ तुझेही ओळखपत्र दाखव. त्यावेळी त्याने विचारणा करत का दाखवू असे म्हणण्याचे नाटक केले असता त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे समोर उभे असलेले सीताराम बाबा भांबावले व त्यांना कोणत्यातरी माध्यमातूम भुरळ घालण्यात चोरटे यशस्वी होताच बाबाकडून हातातील सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली. यात सुमारे 8 ते 9 तोड्याची 60,000 रुपये किमितीची सोन्याची अंगठी चोरट्यानी चोरून नेताच बाबांच्या लक्षात आले की बोटातील अंगठी गायब झाली. यावेळी बाबांनी आरडाओरड केली मात्र चोरटे क्षणात पसार झाले.

उत्तर:

सीताराम बाबांनी तदनंतर पोलिसात धाव घेतली आहे. पाचोरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी बनावट पोलिसांना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

संदेश:

बनावट पोलिसांकडून सावधान राहा. कोणीही तुम्हाला पोलीस म्हणून ओळखले तर त्यांचे ओळखपत्र तपासा. जर तुम्हाला काही शंका असेल तर पोलिसांना कळवा.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button