क्राईमखान्देश

पोलिसांची उत्तम कामगिरी उमिया मार्बल जवळील पडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली !

पोलिसांची उत्तम कामगिरी उमिया मार्बल जवळील पडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली !

पाचोरा (प्रतिनिधी) – दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील जामनेर  रोडवरील उमिया मार्बल समोरील हिरव्या गवतात अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला  असता एकाच चर्चा सुरु होऊन तर्क वितर्क लावले जात होते पोलिसांना ही माहिती मिळताच  तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या स्थळावरून मृतदेह ताब्यात घेवून जागेची पाहणी करत पंचनामा केला होता. संबंधित मृतदेहाजवळ पोलिसांना  एक जिओ कंपनीचा मोबाईल आढळून आला , सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची दुर्गंधी पसरलेली होती, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहावरून ओळख पटविण्यासाठी मोठी अडचण पोलिसांसमोर येत असतानाच जिओ कंपनीचा बंद अवस्थेत आढळून आलेला मोबाईल दुरुस्त करण्याचा निर्णय पाचोरा पोलिसांनी घेतला, तातडीने मोबाईल पाचोरा येथीलच मोबाईल दुकानावरून रिपेअर करून त्याचा डिस्प्ले बसवून मोबाईल चालू करण्यात आला, त्यातील नंबरचा आधारे शोध शोध घेवून सदर मृतदेह पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र. बो.येथील विष्णू युवराज दुधे वय 31 याचा असल्याचा समोर आले आहे, सदर युवक हा सिल्लोड तीन वर्षांपासून कामानिमित्त गेलेला होता.  तर त्याची पत्नी ही दोंडाईचा येथे राहत होती, मात्र युवक पाचोरा येथे अशा अवस्थेत आढळून आल्याने युवकासोबत नेमके काय घडले युवक त्या भागात का गेला , हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नव्हते त्यामुळे  पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. तर सदर युवकाच्या DNA मेडिकल रिपोर्ट साठीची पुढील कारवाई केली जाणार असून त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करून नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. पाचोरा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सर्व बाबी समोर ठेवत कुजलेल्या अवस्थेत कधीही ओळख न पटू शकणा-या कुजलेल्या  मृतदेहाची ओळख काही तासातच पटविली त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत असून ,मात्र या युवकाच्या अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने गावात शोककळा तर रहदारीच्या असलेल्या परिसरात जान-या येणा-या वा दुकानदारास मृतदेह दिसु नये किंवा कसला वास येत आहे हे समजू नये . ही देखील एक शोकांतिका म्हटल्यास वावगे ठरणार नाही . तरी असो पाचोरा पोलिसांचे पुन्हा एकदा आभार प्रसंगी यात पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय योगेश गणगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेशक पथक प्रमुख पोलीस हवलदार मल्हार देशमुख, ज्ञानेश्वर महाजन , पोलीस कॉन्स्टेबल सदीप भोई, प्रकाश शिवदे, योगेश पाटील, अशांच्या पथकाने विदारक  अवस्थेत असलेल्या मृतदेह कोणाचा हा शोध घेतल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button