खान्देशजळगांव जिल्हा

मुख्यमंत्री यांचे विरोधकांवर टिकास्त्र तर पुढील टप्पा डॉक्टर आपल्या दारी खोचक सल्ला !

डॉक्टर आपल्या दारी’ पोटदुखीवाल्यांसाठी उपक्रम पाचोऱ्यात मुख्यमंत्री शिंदेननी उद्धव ठाकरेंवर साधला  निशाणा
पाचोरा (प्रतिनिधी)- : पाचोरा येथे सर्वात प्रथम शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला . शिंदे यांनी भाषणाची सुरवात अहिराणीतून केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते ते पुढे म्हणाले कि ,  शासन दारी येते, लोकांना लाभ देते, हे पाहून अनेकांना पोटदुखी झाली आहे. या पोटदुखीवर उपचारासाठी लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.  राज्य शासनातर्फे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाचोरा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीकास्त्र सोडले.  पुढच्या टप्प्यात ‘डॉक्टर आपल्या दारी’, तसेच दिला. महिला बचत गटांना बळ देण्याचे काम शासन हाती घेणार आहे. शासनाच्या या सर्व चांगल्या गोष्टींचा धसका घेऊन विरोधक तथ्यहीन शासनावर टिका करितात मात्र , या पोटदुखीवाल्यांनी पाटणकरांचा काढा घ्यावा, असा खोचक सल्ला ही त्यांनी तुम्ही घरी बसलात. आम्ही लोकांच्या दारी जातोय, लोकांना मदत करतोय. तुम्ही का केली नाही मदत? तुम्हाला संधी होती. आता केळी, कापसावर प्रक्रिया उद्योगांसाठी प्रयत्न – अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यात केळी व कापसावर प्रक्रिया उद्योग येत्या काळात उभे राहायला हवेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधकांना उद्देशून तुम्हाला पोटदुखी का होते, असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले. देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी स्तुतिसुमनेही मुख्यमंत्र्यांनी उधळली.  दरम्यान, या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या निर्माणात दंगलीचा कट दिसतो आहे. यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते, तर संजय राऊत यांच्याबाबत बोलायलाच नको, असे सांगितले. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button