खान्देशजळगांव जिल्हा
छायाबाई गोपाल परदेशी यांची शहापुरा पोलीस पाटील पदी निवड !

छायाबाई गोपाल परदेशी यांची शहापुरा पोलीस पाटील पदी निवड !
पाचोरा प्रतिनिधी (अतुल माळी लोहारा) – नुकत्याच जळगाव येथे झालेल्या लेखी व पाचोरा येथे झालेल्या तोंडी परीक्षेत चांगले यश संपादन करीत छायाबाई गोपाल परदेशी यांची पोलीस पाटील पदी निवड जाहली असुन ते पाचोरा तालुका शहापूरा या गावाचा पोलीस पाटील पदाचा कार्यभार स्वीकारनार असून पाचोरा उपविभागीय अधिकारी अहिरे यांनी तसे पत्र त्यांना दिले आहे . लोहारा कार्यक्षेत्रातील शहापुरा या गावाच्या कायदा व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक महिलेच्या हाती धुरा आली असून सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे .



