अन्य

मुख्यमंत्री दौऱ्यामुळे पाचोरा येथे वाहतूक मार्गात असा आसेल आजचा बदल !

मुख्यमंत्री दौऱ्यामुळे पाचोरा येथे वाहतूक मार्गात असा आसेल आजचा बदल 

जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव चाळीसगांव चांदवड हा राज्य मार्ग गेला असून सदर कार्यक्रमाचे दिवशी जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले आहेत. –  जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहनांकरिता १२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजता पर्यंत पर्यायी वाहतूक मार्ग वळविण्यात आला आहे. जळगांव येथून पाचोरा मार्ग चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने हे पाचोरा मागे न जाता जळगांव – एरंडोल- कासोदा भडगाव मार्ग चाळीसगांवकडे जातील. चाळीसगांव येथून पाचोरा मार्ग जळगावकडे जाणारी अवजड वाहने हे चाळीसगांव- भडगांव- कासोदा एरंडोल मागे जळगांव कडे जातील.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button