खान्देश

नगर जिल्ह्यातील हरेगाव येथील घटनेचा भडगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध!

नगर जिल्ह्यातील हरेगाव येथील घटनेचा भडगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध!

भडगाव प्रतिनिधि _( संजय शेवाळे)अहमद नगर जिल्ह्यातील हरेगाव येथील घटनेचा भडगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील दलित समाजातील तरुणांना कबूतरे व शेळी चोरण्याचा संशयावरून जातीयवादी गाव गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी रिपाइं आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करून तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हरेगाव येथील जातीयवादी गाव गुंड नाना गलांडे,मनोज बोडके, दिपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजु बोरने यांनी दलित समाजातील तरुणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्यांना झाडाला बांधुन त्यांच्यावर लघुशंका केली त्यामुळे या घटनेचा भडगाव तालुका रिपाई आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे अश्या गुंड प्रवृत्तीच्या गावगुंड यांचा त्वरित बंद बसतो करावा व त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे..
पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्यात अश्या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने आंबेडकर समाजातील घटकात प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली आहे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले निवेदनावर तालुका अध्यक्ष एस.डी.खेडकर आण्णा ,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक खरे, मातंग आघाडीचे आण्णा साठे, ईश्वर बावीस्कर, सुधाकर दोंदे, कामगार आघाडीचे परमेश्वर सुर्यवंशी, देवा बावीस्कर, गुरुदास भालेराव, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, किसन मोरे, सुधाकर सोनावणे, प्रकाश सुर्यवंशी, भारत धोबी, सागर भोई, भाऊसाहेब सुर्यवंशी, परशुराम सुर्यवंशी, बाळू निकम, सचिन बागूल, कांतीलाल मोरे, प्रीतम सोनवणे, निंबा ब्राह्मणे, शुभम खेडकर, प्रदीप खैरे, महेंद्र सरदार, रवी सुर्यवंशी, संतोष सॅन दाणे, नंदू सरदार, विनोद खेडकर, धोंडू राखूदे, राजू फासगे, दगडू गायकवाड, तुकाराम मोरे, नाना पैठणकर, संजय मोहिते, कैलाश मोरे, पिया राखंऊडे, ईश्वर राखूनदे, भारत धोबी, सुखदेव सोनवणे, भाऊसाहेब केदार, अनिल केदार, अजित बावीस्कर, चंद्रमनी सोनावणे, संभाजी मोरे, भगवान खेडकर, गौतम खेडकर, अनिल जगताप, आनंद साठे, अजय निकम , प्रदीप सोनवणे, यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठया प्रमाणावर हजर होते..

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button