क्रीडा

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोराच्या नावावर विजयी हायट्रिक! 

* गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोराच्या नावावर विजयी हायट्रिक! 
पाचोरा तालुक्यात सुरु असलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी एम.एम.कॉलेज या ठिकाणी क्रीडा व युवासेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित पाचोरा तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतलेला होता.त्यात 17 वर्ष आतील मुलांचा अंतिम सामना गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा विरुद्ध कै.पी.के.शिंदे स्कूल, पाचोरा यांच्यात रंगला. अटीतटीच्या सामन्यात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ने अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरावर पात्र ठरला आहे. विजयी संघात वैभव परदेशी, लोकेश पाटील व पृथ्वीराज परदेशी या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
तसेच दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी 14 वर्ष आतील व 22 ऑगस्ट 2023 रोजी 17 वर्षे आतील बुद्धिबळाचे सामने श्री गो.से हायस्कूल पाचोरा या ठिकाणी संपन्न झाले. त्यात 14 वर्षा आतील मुलींमध्ये श्रावणी अलाहित ही जिल्हास्तरासाठी पात्र ठरली आहे व 17 वर्षा आतील मुलींमध्ये आदिती अलाहीत हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला व हर्षिता कुकरेजा हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे .दोघेही जिल्हास्तरावर पात्र ठरल्या आहेत.विजयी खेळाडूंचे गुरुकुल शाळेचे प्राचार्य प्रेम शामनानी  , पर्यवेक्षिका अमेना बोहरा व शाळेतील शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.अशा प्रकारे तीन ही क्रीडा स्पर्धेत ग्रुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून जिल्हा पातळीवर प्रवेश केला.विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button